Pune Accident : भरधाव रुग्णवाहिकेच्या धडकेने कात्रज डेअरीजवळ दुचाकीस्वाराचा मृत्यू

भरधाव रुग्णवाहिकेने धडक दिल्याने एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना पुणे -सातारा रस्त्यावरील कात्रज डेअरीजवळ घडली.
accident
accidentsakal
Updated on

पुणे - भरधाव रुग्णवाहिकेने धडक दिल्याने एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना पुणे -सातारा रस्त्यावरील कात्रज डेअरीजवळ घडली. या अपघातानंतर रुग्णवाहिका चालक पसार झाला आहे.

पांडुरंग वामन पंधेरे (वय ४८, रा. सिध्दीविनायक सोसायटी, दत्तनगर, आंबेगाव) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा रोहित पंधेरे यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून रुग्णवाहिका चालक अमर शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार पांडुरंग पंधेरे हे सोमवारी दुपारी सव्वातीन वाजता घरी निघाले होते. ते कात्रज डेअरीजवळ आल्यानंतर त्यांना भरधाव रुग्णवाहिकेने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने पंधेरे यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर रुग्णवाहिका चालक पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक समीर कदम करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com