इंदापूरचे शेतकरी आक्रमक, रस्त्यावर ओतले दूध

indapur
indapur

वालचंदनगर (पुणे) : दुधाला समाधानकारक दर मिळत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज दूध दर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे इंदापूर तालुक्यातील सुमारे २ लाख लिटर दुधाचे संकलन बंद राहिले. आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी दूध रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध केला.

राज्यामध्ये दूध पावडरचे साठे शिल्लक असताना दूध पावडरची आयात केली जात आहे. केंद्र व राज्य सरकारचे  शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष असल्यामुळे शेतकऱ्यांच्या दुधाला कमी दर मिळत आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसाय तोट्यात चालला आहे. शेतकरी वर्ग संकटामध्ये सापडला आहे. शेतकऱ्यांच्या दुधाला प्रतिलिटरला किमान ३० रुपये दराची गरज असताना  शेतकऱ्यांना सरासरी २० रुपयांचा दर मिळत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज दूध दर आंदोलन छेडले.  

इंदापूर तालुक्यामध्ये आंदोलनाचा दुध संघाना फटका बसला. इंदापूर तालुक्यात दररोज सुमारे २ लाख लिटर दुध संकलन होते. आंदोलनामुळे बहुतांश दुध संघानी संकलन बंद ठेवले होते. पश्‍चिम भागातील सणसर गावामध्ये दूध दरवाढीचे आंदोलन झाले. शेतकरी संघटनेच्या वतीने सणसर गावातील ग्रामदैवत भैरवनाथ दुधाचा अभिषेक घालण्यात आला. आंदोलनामध्ये शेतकऱ्यांच्या भावना तीव्र झाल्याने शेतकऱ्यांनी बारामती- इंदापूर राज्यमार्गावर दूध रस्त्यावर ओतून केंद्र व राज्य सरकारचा निषेध केला. दुधाला प्रतिलिटरला ५  अनुदान द्यावे, दुध पावडर निर्यातीसाठी ५० रुपये प्रतिकिलो अनुदान देण्याची मागणी करण्यात आली. या वेळी शेतकरी संघटनेचे युवकचे प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम, रोहन घोरपडे, सौरभ कदम, नितीन कदम, अमोल चव्हाण, विशाल भोइटे, संतोष काळे, रामभाऊ शिंदे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com