The Burning Car : नवले पुलाजवळ धावत्या कारला भीषण आग; महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत

नवले पुलाजवळील स्मशानभूमी परिसरात साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर धावत्या चारचाकी वाहनाला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली.
burning car near navale bridge

burning car near navale bridge

sakal

Updated on

धायरी - मुंबई–बंगळूर महामार्गावरील नऱ्हे येथील नवले पुलाजवळील स्मशानभूमी परिसरात साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर धावत्या चारचाकी वाहनाला सोमवारी रात्री साडेसातच्या सुमारास अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. काही क्षणांतच आगीने संपूर्ण वाहनाला वेढा घातल्याने कार पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने वाहनचालक रोहित कडसकर (वय ३१) यांनी प्रसंगावधान राखत वेळेत बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com