'पुणे विमानतळावर पेशवाईची चित्रे, पण शिवरायांचा इतिहास का नाही'

'पुणे विमानतळावर पेशवाईची चित्रे, पण शिवरायांचा इतिहास का नाही'
Summary

पुणे विमानतळावर पेशवाईची चित्रे दिसतात पण मग शिवरायांचे कर्तृत्व का दिसत नाही असा सवाल खासदार अमोल कोल्हे यांनी विचारला आहे.

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी सोशल मीडियावर पुणे (Pune) विमानतळावर काढण्यात आलेल्या पेटिंग्जबद्दलची पोस्ट सध्या चर्चेत आहे. यामध्ये त्यांनी पुणे विमानतळावर पेशवाईची चित्रे दिसतात पण मग शिवरायांचे कर्तृत्व का दिसत नाही असा सवाल त्यांनी ट्विटरवर विचारला आहे. पुण्याच्या विमानतळावर पोचल्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांचं लक्ष काही पेंटिंग्जने वेधलं. त्यात पेशवाईची काही चित्र होती असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच पेंटिंग्जसोबतचा सेल्फी आणि एक फोटोही त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

अमोल कोल्हे यांनी म्हटलं की, ज्या पुणे जिल्ह्यात शिवाजी महाराजांचा‌ जन्म झाला, पुण्यात‌‌ त्यांनी शाहिस्तेखानाची बोटं छाटली. त्या शिवाजी महाराजांचं कर्तृत्व पुणे विमानतळावर का दिसत नाही. शिवाजी महाराज, संभाजी‌ महाराज यांचा इतिहास सांगणारं विमानतळावर काहीच नाही, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करीत‌ ट्विट केले आहे.

'पुणे विमानतळावर पेशवाईची चित्रे, पण शिवरायांचा इतिहास का नाही'
शिवसेनेला भगव्याची लाज वाटते; देवेंद्र फडणवीस

पेशव्यांच्या पराक्रमाविषयी आदर आहेच, परंतु पुण्यात केवळ शनिवारवाडा नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या 'सर्जिकल स्ट्राईक'चा लालमहालसुद्धा आहे. सिंहगडही आहे आणि याच जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरीसुद्धा आहे. तसेच छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदानस्थळ वढू तुळापूर देखील आहे. याचा पुणे एअरपोर्ट आॅथॅरिटीला विसर पडला की काय, असा सवालही खासदार कोल्हे यांनी उपस्थित‌ केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com