खासदार अमोल कोल्हे यांची आदिवासींसाठी मोठी मागणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 मे 2020

जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्‍यातील आदिवासी क्षेत्रातील गावांमध्ये "मनरेगा'अंतर्गत सार्वजनिक व वैयक्तिक लाभाची कामे तत्काळ सुरू करा,' अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली. 

पुणे : "आदिवासी क्षेत्रातील अर्थचक्र सुरू करण्यासाठी जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्‍यातील आदिवासी क्षेत्रातील गावांमध्ये "मनरेगा'अंतर्गत सार्वजनिक व वैयक्तिक लाभाची कामे तत्काळ सुरू करा,' अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली. 

मुंबईकरांमुळे पुणेकरांना धोका, कोरोनाचा सुरू आहे मुंबई- पुणे- मुंबई प्रवास  

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर झाल्यापासून देशभरातील अर्थचक्र थंडावले होते. मात्र, आता लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर अर्थचक्र सुरू करण्यासाठी सरकारने पाऊल उचलत आहे. त्यावेळी ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करण्यासाठी "मनरेगा'अंतर्गत रस्ते, गावतळी, वृक्ष लागवड अशी विविध प्रकारची कामे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आदिवासी क्षेत्रातील गावांमध्ये "मनरेगा'अंतर्गत कामे सुरू करा, अशी मागणी डॉ. कोल्हे यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे केली आहे. 

उरुळी कांचनच्या भर चौकात पोलिसाला टोळक्‍याकडून बेदम मारहाण 

दरम्यान, डॉ. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लोकप्रिय खासदार आहेत. त्यांच्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील खेड, जुन्नर, आंबेगाव या तालुक्‍यांमध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. विशेष म्हणजे पुणे जिल्हा परिषदेची सत्ता ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे आहे. त्यामुळे त्यांनी आदिवासी भागासाठी केलेल्या या मागणीचा निश्‍चितच जिल्हा परिषद प्रशासनाला विचार करावा लागणार आहे. 

आदिवासी भागात पावसाळा सुरू होण्यापूर्वी "मनरेगा'अंतर्गत अनेक कामे सुरू करता येतील. त्यामुळे आदिवासी बांधवांना रोजगार मिळेल आणि गेल्या दोन महिन्यांपासून रुतून बसलेला अर्थचक्राचा गाडा सुरळीत होण्यासाठी त्याचा उपयोग होईल. त्यामुळेच आपण मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना पत्र पाठवून जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्‍याच्या गटविकास अधिकाऱ्यांना त्वरित मनरेगाची कामे सुरू करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. 
- डॉ. अमोल कोल्हे
खासदार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Amol Kolhe demands to start work in tribal areas under MGNREGA scheme