esakal | अमोल कोल्हे यांच्य या पंचसूत्रीचे पालन करा...कोरोनाला दूर रोखा....
sakal

बोलून बातमी शोधा

dr amol kolhe

कोरोनाला घाबरू नका, मात्र जागृक रहा, असे आवाहन करून खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी राज्यातील नागरिकांना कोरोनाला रोखण्यासाठी एक पंचसूत्री सांगितली असून, तिचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.  

अमोल कोल्हे यांच्य या पंचसूत्रीचे पालन करा...कोरोनाला दूर रोखा....

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनाला घाबरू नका, मात्र जागृक रहा, असे आवाहन करून खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी राज्यातील नागरिकांना कोरोनाला रोखण्यासाठी एक पंचसूत्री सांगितली असून, तिचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.  या पंचसूत्रीचे पालन केल्यास आपण कोरोनाला निश्चित रोखू शकतो, असा त्यांना विश्वास आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी, याविषयी राज्य सरकारचा आरोग्य विभाग जनजागृती करत आहे.  खासदार डाॅ. अमोल कोल्हे हेसुद्धा कोरोनाच्या संकटाला सुरवात झाल्यापासून विविध माध्यमांतून नागरिकांना मार्गदर्शन करत आहेत. राज्य सरकारच्या आरोग्य विभागानेही त्यांच्यामार्फत नागरिकांना आवाहन केले आहे. त्यासाठी अमोल कोल्हे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून नागरिकांना कोरोनाला रोखण्यासाठी एक पंचसूत्री सांगितली आहे.  

याबाबत खासदार कोल्हे यांनी सांगितले की, कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड 19 या आजाराचे भय दिवसेंदिवस वाढत चालले आहे. एक डाॅक्टर आणि जनतेचा प्रतिनिधी म्हणून आपल्याला सांगतो की, हा एक नवीन आजार आहे. या आजाराची माहिती दररोज नव्याने समोर येत आहे. महाराष्ट्र सरकारचा सार्वजनिक आरोग्य विभाग सर्वौतोपरी प्रयत्न करतच आहे. परंतु, तुमची आणि आमची जबाबदारीही महत्त्वाची आहे. या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी तुम्ही आणि आम्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. त्यासाठी पंचसूत्री  महत्त्वाची आहे. 

अमोल कोल्हे सांगतात, कोरोनाचा वार झेलायला..माझी ढाल...माझा मास्क

अमोल कोल्हे यांची पंचसूत्री
1) आपले हात वारंवार पाणी आणि साबणाने स्वच्छ धुवा. आपले हात धुण्यासाठी अल्कोहोल बेस सॅनिटायझरचाही वापर करू शकता.
2) शिंकताना किंवा खोकताना तोंडावर रुमाल किंवा टिश्यू पेपर धरावा
3) सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. तसेच, अत्यंत अत्यावश्यक असेल, तर आपल्या आणि इतरांमध्ये कमीत कमी तीन फुटांचे अंतर असावे
4) ताप, कोरडा खोकला, श्वास घेण्यास त्रास किंवा न्यूमोनिआ या सारखी लक्षणे आढळून आल्यास कोणताही विलंब न लावता डाॅक्टरांचा सल्ला घ्या. 
5)अफवांवर विश्वास ठेवू नका. सार्वजनिक खात्याच्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा. जर आपल्याला काही शंका असेल, तर ती योग्य ठिकाणीच विचारा. 

विद्यापीठ चौकातील ते पूल पाडण्यास सुरवात

महाराष्ट्र सरकार आणि सरकारी कर्मचारी दिवस रात्र एक करून या आजाराला नियंत्रीत ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. म्हणून आपली जबाबदारी दुय्यम ठरत नाही. सांगितलेल्या या गोष्टी जरी केल्या, तरी आरोग्य विभागाला आपले मौल्यवान सहकार्य लाभेल. त्यामुळे लक्षात ठेवा. कोरोनाला घाबरू नका. जागृक रहा. 
 - अमोल कोल्हे, खासदार  
 
Edited by : Nilesh Shende