Vidhan Sabha 2019 : चेतन तुपेंच्या प्रचारार्थ डॉ. कोल्हेंच्या रॅलीस उदंड प्रतिसाद

MP Dr. Amol kolhe rally Got overwhelming response to support Chetan Tupe
MP Dr. Amol kolhe rally Got overwhelming response to support Chetan Tupe

हडपसर : तुफान गर्दी, जल्लोषपूर्ण वातावरणात महाआघाडीचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार व नगरसेवक चेतन तुपे यांच्या प्रचारार्थ शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज रॅलीद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी ''नगरसेवक म्हणून चेतन तुपे यांनी विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. त्यांच्या भागातल्या प्रत्येक नागरिकांशी त्यांचा जिव्हाळ्याचा संवाद आहे. लोकांना त्यांच्याविषयी आपलेपणा जाणवतो. त्यामुळे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व त्यांच्या सक्षम हातात द्यावे, असे आवाहन डॉ. कोल्हे यांनी केले.


रविवारी मुंढवा, केशवनगर, मांजरी, महादेवनगर, आकाशवाणी, सातववाडी, गोंधळेनगर, तुकाई दर्शन, काळेपडळ, ससाणे नगर, हडपसर गाव, रामटेकडी या मार्गावर ही रॅली संपन्न झाली. डॉ. कोल्हे म्हणाले, ''आमदार हा जनतेच्या अडी अडचणी सोडविणार असावा, लोकांमध्ये जाऊन, त्यांच्या सुख-दुःखाशी समरस होत त्यांच्या भावना जाणून घेणारा, मन जपणारा असावा. लोकांच्या मनात जे ठरतं तेच मतात उतरतं. लोकांनी ठरवलं तर एका साध्या माणसाला यशाच्या शिखरावर नेण्याची आणि शिखरावरच्या माणसाला जमिनीवर आणण्याची क्षमता त्यांच्यात असते. त्यामुळे कोणी काहीही ठरवलं तरी, जनतेचा कौल महत्वाचा असतो. तो कौल या निवडणूकीत तुपे यांना निश्चितपणे मिळेल. कारण 'छत्रपतींचा आशिर्वाद घेऊन राज्यात सत्तेत आलेल्या युती सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन निव्वळ जनतेला फसविण्याचे काम केले आहे.'' 

''शिवछत्रपतींचा चालवू पुढे हा वारसा, भ्रष्टाचारी व खंडणीखोरांना दाखवू आरसा, अठरा पगड जातीं जोडोनियां शिस्तबद्ध हडपसरच्या प्रगतीसाठी चेतन तुपें आहे कटिबद्ध'' असे आश्वासन महाअघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांनी यावेळी मतदारांना दिले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, सुरेश घुले, राजलक्ष्मी भोसले, कैलास कोद्रे नगरसेवक प्रशांत जगताप, नंदाताई लोणकर, आनंद अलकुंटे, योगेश ससाणे, बंडूतात्या गायकवाड, पूजा कोद्रे, हेमलताताई निलेश मगर, वैशाली बनकर, प्रशांत तुपे  फारुक ईनामदार अशोक कांबळे अजिंक्य घुले, सुनील बनकर, मगर दिलीप तुपे संजय लोणकर दिलीप घुले, लाला गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, रिपाई जोगेंद्र कवडे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com