MP Nilesh Lanke Leads Hundreds of Supporters in Voluntary Labour at Rajgad Fort
sakal
वेल्हे, (पुणे) - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात आणि स्वराज्याच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या किल्ले राजगडावर खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली ‘आपला मावळा’ संघटनेच्या माध्यमातून रविवार (ता. ३०) रोजी दुर्गसंवर्धन व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ‘आपला मावळा’ संघटनेची ही १७ वी दुर्गसंवर्धन मोहीम असून, या उपक्रमात शेकडो स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत राजगडाच्या संवर्धनासाठी श्रमदान केले.