Loksabha 2019 : मी निधड्या छातीचा मराठा : आढळराव पाटील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 मार्च 2019

शिरूर लोकसभा मतदार संघातून चौथ्यांदा निवडून आल्यानंतर आपण सगळे विमानाने जाऊन दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या पाया पडू, त्यांच्या पायावर शिरूर लोकसभेचा माथा ठेऊ आणि आढळरावांसाठी केंद्रीय मंत्रीपद मागू असे वक्तव्य करत आमदार शरद सोनवणे यांनी मतदारांसमोर मुक्ताफळे उधळली.

शिरुर : मी निधड्या छातीचा मराठा आहे, मला कुणी आव्हान देऊ नये, असे म्हणत शिरूर लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे निश्चित उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांनी पुन्हा एकदा आपल्या जातीचा उल्लेख करत जातीपातीच राजकारण करायला सुरुवात केली. 

शिरूर लोकसभा मतदार संघातून चौथ्यांदा निवडून आल्यानंतर आपण सगळे विमानाने जाऊन दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या पाया पडू, त्यांच्या पायावर शिरूर लोकसभेचा माथा ठेऊ आणि आढळरावांसाठी केंद्रीय मंत्रीपद मागू असे वक्तव्य करत आमदार शरद सोनवणे यांनी मतदारांसमोर मुक्ताफळे उधळली.

शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून डॉ. अमोल कोल्हे यांच्या नावाची घोषणा होताच आढळराव यांनी प्रचार संभाना सुरवात केली. भोसरीमध्ये झालेल्या विजयी निर्धार सभेत आढळराव आणि आमदार सोनवणे यांनी केलेल्या अशा वक्तव्यामुळे शिरूर लोकसभा मतदार संघातील राजकारण तापणार हे निश्चित मानले जाते. दरम्यान शिवनेरी ते संभाजी महाराज यांची समाधी असलेल्या वडू आणि नंतर भोसरीपर्यंत रॅली काढली.

Web Title: MP Shivaji Adhalrao Patil again says caste in loksabha election rally