Loksabha 2019 : माझा दादा म्हणतो तेच खरं होते : सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 एप्रिल 2019

माझा दादा जे बोलला तसेच होईल. मला मतदान करताना नेहमीच भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सर्वांना हा अधिकार दिला आहे. मतदान करण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. 

बारामती : बारामतीतील मताधिक्याबाबत माझा दादा जो बोलला आहे, तसेच होईल. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे. माझा दादा म्हणतो तेच खरे होते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीतील उमेदवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. 

सुप्रिया सुळे यांनी आज (मंगळवार) सकाळी कुटुंबियांसह बारामती येथे मतदान केले. त्यावेळी त्यांच्यासमवेत आई उपस्थित होती. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्याविरोधात भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे येथील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांनी आज सकाळी मतदानानंतर बारामतीत सुप्रिया सुळेंचाच विजय होईल असे म्हटले होते. तसेच त्यांनी येथे भाजप जिंकले, तर राजकारणातून निवृत्ती घेईन असे म्हटले होते.

यावर मतदानानंतर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, की माझा दादा जे बोलला तसेच होईल. मला मतदान करताना नेहमीच भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सर्वांना हा अधिकार दिला आहे. मतदान करण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Supriya Sule confident about in Baramati Loksabha constituency