माळेगाव - शेतकऱ्यांच्या जीवनात अर्थिक संपन्नता आणण्यासाठी सहकार चळवळ खूप महत्वाची आहे. पवार साहेबांनीही सुरवातीपासूनच सहकाराच्या माध्यमातून कृषी क्षेत्रासह सहकारी साखर कारखांदारीला चालना दिली..साखर कारखांदारीला साखर निर्मितीबरोबर डिस्टलरीसारख्या उपपदार्थ निर्मितीला शासनस्तरावर प्रोसाहन दिले आणि शेतकऱ्यांना अधिकचे दोनपैसे मिळवून देण्याचा मार्ग मोकळा केला. त्यामध्ये माळेगाव कारखान्याचाही समावेश आहे. हे सांगताना मला अभिमान वाटतो, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले..माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखाना निवडणूक पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा बळीराजा सहकार बचाव पॅनेल तयार झाला आहे. या पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाला. यावेळी सभासदांना मार्गदर्शन करताना सुळे बोलत होत्या.युवा नेते युगेंद्र पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतिश खोमणे, अॅड. एस. एन. जगताप, माळेगावचे संचालक सुरेश खलाटे, भगतसिंग जगताप, सोपानराव आटोळे, ज्ञानदेव बुरुंगले, गणपत देवकाते, मिथून आटोळे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. दरम्यान, सौ. सुळे म्हणल्या,' देशात, राज्यात सत्तेचे विक्रेंद्रीकरण झाले पाहिजे, या मताची मी आहे..त्यामुळे माळेगावच्या निवडणूक ही बिनविरोध होणे अपेक्षित होते. परंतु तसे झाले नसल्याने आम्हाला या निवडणूकीत पॅनेल उभा करावा लागला. खासदार होताना मी मोठा संघर्ष केला. तो संघर्ष करताना माळेगावच्या कार्यक्षेत्रात तुम्ही मोठी साथ दिली. त्यामुळे मी आणि अमोल कोल्हे आपापल्या मतदार संघात दीड लाखाच्या मताधिक्याने निवडून आलो..संसदेमध्ये आयकर विभाग, एक देश एक निवडणूक आदी विषयांचे बिल येत आहे. तुमच्या मताच्या जोरावर मी कमिटी सदस्य म्हणून काम करते. 'ऑपरेशन सिंदूर'च्या विषयात सात देशात जावून मी प्रतिनिधित्व केले. याचा अर्थ मी सताधाऱ्यांशी जवळीक साधली नाही. प्रथम देश नंतर महाराष्ट्र, पक्ष संघटना आणि कुटुंब अशापद्धतीने मी प्रमाणिकपणे काम करीत आहे.`.'बारामतीकर आणि पवारसाहेब यांचे नाते खूपच प्रमाचे आणि आपुलकीचे आहे. माळेगाव कारखान्याचे सभासद पवारसाहेब आणि मी आहे. माझ्या ऊसाला चांगला दर मिळाला पाहिजे आणि संस्था अर्थिक दृष्ट्या सक्षम असली पाहिजे, ही माझी व सभासदांची माफक अपेक्षा आहे.त्यामुळे यापुढील काळात हा माळेगाव कारखाना व येथील शिक्षण संस्था उत्तम चालण्यासाठी मी स्वतःहा लक्ष घालणार आहे. संपूर्ण कारभार पारदर्शक होईल व कामगार भरतीमध्येही समतोल राहिली. नीरा नदीचे प्रदूषणाचा प्रश्न केंद्र सरकारच्या माध्यमातून मार्गी लावेल. ऐवढा विश्वास सभासद बंधूना देते..या विश्वासाच्या जोरावर बळीराजा सहकार बचाव पॅनेला भरघोस मतदान करा,` असे आवाहन सौ. सुळे यांनी केले. यावेळी युगेंद्र पवार यांनीही माळेगावच्या प्रशासनाने यंदा २८०० रुपये पहिला हप्ता दिला, तेव्हा आम्ही कारखान्याच्या दारात आंदोलन केल्यामुळे माळेगावने अधिकचे ३३२३ रुपये प्रतिटन यंदा दिला, असे आवर्जून सांगितले. सुरेश खलाटे यांनी पॅनेल निवडून आल्यावर प्रतिटन चार हजार रुपये भाव दिला जाईल, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनराज निंबाळक यांनी कले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.