
बारामती : चेन्नई येथील 'प्राईम पॉईंट फौंडेशन'च्या वतीने देण्यात येणाऱ्या 'संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान' या पुरस्कारासाठी खासदार सुप्रिया सुळे यांची निवड करण्यात आली आहे. संसदेतील सातत्यपूर्ण उकृष्ट कामगिरी आणि मतदार संघातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी स्थानिक प्रशासनापासून केंद्र सरकारपर्यंत करत असलेल्या प्रयत्नांसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे 'प्राईम पॉईंट फौंडेशन'चे श्रीनिवासन यांनी कळविले आहे.