खासदारपदाच्या हॅटट्रिकच्या वर्षपूर्तीनिमित्त सुप्रिया सुळे यांनी केलाय `हा` संकल्प

राजेंद्रकृष्ण कापसे
Sunday, 24 May 2020

खासदार पदाची हॅट्ट्रिक झाली. त्या विजयाच्या वर्षपूर्ती निमित्त खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेचे आभार मानले आहे.

खडकवासला (पुणे) : आपल्या मतदारसंघाला देशात 'नंबर वन' करण्याचे स्वप्न आपण पाहिलेय. संसदेत जनतेचा आवाज ठामपणे मांडण्यासाठी जेवढं अधिक सक्रीय राहता येईल तेवढं राहण्याचा मी सदैव प्रयत्न करीत असते. मला सदैव आपुलकीची साथ मिळत असते. असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी मानले मतदार संघातील जनतेचे आभार मानले. खासदार पदाची हॅट्ट्रिक झाली त्या विजयाच्या वर्षपूर्ती निमित्त खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेचे आभार मानले आहे.

चिंताजनक : सदाशिव पेठ ते कोथरुड कोरोना कनेक्शन वाढली चिंता

त्या म्हणाल्या, `लोकसभेची निवडणूक झाली. त्याला बघता बघता एक वर्ष झालं देखील... आपण सर्वांनी माझ्यावर मोठ्या विश्वासाने पुन्हा एकदा म्हणजे सलग तिसऱ्यांदा आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविली, याबद्दल मी सदैव आपली आभारी आहे. संसदेत जनतेचा आवाज ठामपणे मांडण्यासाठी जेवढं अधिक सक्रीय राहता येईल तेवढं राहण्याचा मी सदैव प्रयत्न करीत असते. आपलीही त्यासाठी मला सदैव आपुलकीची साथ मिळत असते.

 

 

पुणे विद्यापीठ दीड तासांची ५० गुणांची परीक्षा घेणार

आपल्या मतदारसंघाला देशात 'नंबर वन' करण्याचे स्वप्न आपण पाहिलेय. या स्वप्नाचा पाठलाग करण्यासाठी मी काम करतेय. आरोग्य, शिक्षण, महिला सुरक्षा, रोजगार अशा विविध क्षेत्रात आपल्याला देशात पहिला नंबर आणायचा आहे. हे तुम्हा सर्वांची समर्थ साथ आणि विश्वास असल्यावर शक्य देखील आहे.
आपण सर्वजण माझ्यावर जो प्रेमाचा वर्षाव करीत आहात त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आपला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी अविरत प्रयत्न करतेय.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

कोरोनाच्या या कठिण काळातही आपण माझ्याशी संपर्क साधत आहात. प्रत्येकाच्या अडचणीची वैयक्तिक दखल घेण्याचा माझा प्रयत्न आहे. याशिवाय शासकीय व प्रशासकीय पातळीवर देखील जेवढं काही करता येणं शक्य आहे ते देखील करण्याचा माझा प्रांजळ प्रयत्न सुरु आहे. या प्रयत्नांना यश देखील येत आहे. आपण सर्वजण या संकटाचा एकजुटीने सामना करीत आहोत,  आपण नक्कीच हा लढा यशस्वी करुन दाखवू.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Supriya Sule says, dream of making Baramati Lok Sabha constituency 'number one' in the country