MP Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे यांचा कार्य अहवाल प्रसिद्ध; शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन

जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामाचा हिशेब या अहवालातून मांडत आहे.
mp supriya sule work report
mp supriya sule work reportsakal
Updated on

खडकवासला - अवघ्या देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे निमित्त साधत खासदार सुप्रिया सुळे यांचा बारामती लोकसभा मतदार संघातील मागील पाच वर्षांतील त्यांच्या कार्याचा ‘सेवा, सन्मान, स्वाभिमान’ हा कार्यअहवाल खासदार शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.

शिवजयंती निमित्त शिवाजीनगर येथील एस.एस.पी.एम.एस. संस्थेच्या आवारातील शिवस्मारक छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर अहवालाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते केले. माजी महापौर प्रशांत जगताप, सुनील जगताप, ऍड. भगवानराव साळुंखे, विकास पासलकर, किशोर कांबळे आदी यावेळी उपस्थित होते. शिवजयंतीच्या निमित्ताने खासदार सुळे यांनी कार्यहवाल शिवचरणी अर्पण केला. मतदार संघातील केलेल्या कामांची माहिती दिली.

त्या म्हणाल्या, 'जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामाचा हिशेब या अहवालातून मांडत आहे. या पाच वर्षांच्या काळात खासदार म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघाचा आणि महाराष्ट्राचा आवाज सभागृहात बुलंद करण्याचे काम केले.

मतदार संघासोबत राज्याच्या व्यापक हिताचे, महिला, बेरोजगार तरुण, शेतकरी, मध्यमवर्गीय आदी सर्व घटकांचे प्रश्न सभागृहात मांडण्याचा प्रांजळ प्रयत्न केला. बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने, त्यांचा आवाज सभागृहात मांडण्याचे भाग्य मला लाभले. ही माझ्यासाठी खुप मोलाची गोष्ट आहे'.

बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार म्हणून आपण जनतेची सेवा, शेतकरी- कष्टकरी व महिलांचा सन्मान आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान, ही त्रिसुत्री सदैव डोळ्यासमोर ठेवून काम केले. याचे प्रतिबिंब या अहवालात आपणास पहायला मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, 'आपण सर्वांनी मला आपला आवाज म्हणून लोकसभेत निवडून पाठविले.

माझ्यावर ठेवलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी सदैव काम केले आहे. आपण मला प्रेम, आदर आणि माया दिली याबद्दल मी आपली शतशः ऋणी आहे'.

सुळे यांच्या कार्याचा हा अहवाल लवकरच डिजिटल स्वरुपात त्यांची वेबसाईट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करणार आहे. याबाबत, नागरिकांनी प्रतिक्रिया जरूर कळवाव्यात, असे आवाहन ही सुळे यांनी यावेळी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.