

Pune Ganeshotsav Noise Pollution Check
sakal
- प्रज्वल रामटेके
पुणे - गणेशोत्सवातील कर्णकर्कश आवाजाला आळा घालण्यासाठी आता प्रशासनानेही ‘डेसिबल वॉच’ सुरू केले आहे. पुणे शहरातील तब्बल २०० ठिकाणी ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’कडून (एमपीसीबी) दररोज प्रत्यक्ष ध्वनीपातळीची नोंद घेतली जाणार आहे. निर्धारित मर्यादेपेक्षा आवाज अधिक आढळल्यास संबंधित मंडळाला तो कमी करण्याच्या सूचना दिल्या जातील; तरीही नियमभंग सुरू राहिल्यास थेट कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे ढोल-ताशे, ध्वनिक्षेपक आणि अन्य ध्वनिवर्धक उपकरणांचा अमर्याद वापर करणाऱ्या मंडळांवर यंदा प्रशासनाची करडी नजर राहणार आहे.