इंदापूर : सुगावचे अमोल लहू कांबळे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड

इंदापूर तालुक्यातील सुगावचे सुपुत्र अमोल लहू कांबळे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केल्याने त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली.
MPSC Amol Lahu Kamble selected Sub-Inspector of Police indapur
MPSC Amol Lahu Kamble selected Sub-Inspector of Police indapur sakal

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील सुगावचे सुपुत्र अमोल लहू कांबळे (हल्ली रा. कंदर जि. सोलापूर ) यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केल्याने त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली. त्यांची आई मोल मजुरी करते. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे यश संपादन केले आहे. त्यांना पुणे येथील एस. पी. महाविद्यालयात शिक्षण पूर्ण करण्यासाठी सकाळ इंदापूर तालुका तनिष्का व्यासपीठ गट क्रमांक चार च्या अध्यक्षा डॉ. जयश्री गटकुळ यांनी दत्तक घेतले होते.

त्यांना डॉ. भास्कर गटकुळ यांच्यासह तनिष्का गट क्रमांक १ व २ ने मदत केली होती.अमोल हा शिक्षण पूर्ण करून पोलीस उपनिरीक्षक झाल्याने इंदापूर येथे त्याचा सत्कार डॉ. जयश्री गटकुळ यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी अमोल कांबळे म्हणाले, माझ्या आजच्या यशामागे आई वडीलांचे आशीर्वाद, गुरूचे मार्ग दर्शन,संघर्ष,कष्ट व सकाळ तनिष्का व्यासपीठाचे मोठे सहकार्य आहे.मी पोलीस अधिकारीहोण्याचे स्वप्न सत्यात उतरविले. लवकरच युपीएससी परीक्षेत यश मिळवून पोलीस अधीक्षक बनणार असून सकाळ माध्यम समूहाचे तनिष्का तसेच मधुरांगण व्यासपीठ, इंदापूर लायनेस क्लब च्या कायमस्वरूपी मी ऋणात राहू इच्छितो.

यावेळी डॉ.जयश्री गटकुळ म्हणाल्या, पैश्या अभावी हुशार, होतकरू व गरीब अमोल चे शिक्षण पूर्ण होत नव्हते. त्यामुळे आम्ही त्याला मदत करून कर्तव्य निभावले. लिनेस क्लबच्या अध्यक्षा सौ.उज्वला गायकवाड म्हणाल्या, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी येणाऱ्या संकटाचा सामना धैर्याने करण्यासाठी अमोल यांनी आपला आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. यावेळी जिजाऊ इन्स्टिट्युटच्या सचिव राजश्री जगताप, विश्वराज गटकुळ, नितीन कांबळे, महेश चौधरी, भाऊसाहेब कांबळे, लखन कांबळे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com