MPSC Exam Issue : स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; ‘एमपीएससी’च्या ऑनलाइन परीक्षेला विद्यार्थ्यांचा विरोध

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) आगामी ‘गट क संयुक्त पूर्व परीक्षा’ पासून सर्व परीक्षा ऑनलाइन संगणक आधारित चाचणी (सीबीटी) पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला.
Indefinite hunger strike by competitive exam students

Indefinite hunger strike by competitive exam students

sakal

Updated on

पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) आगामी ‘गट क संयुक्त पूर्व परीक्षा’ पासून सर्व परीक्षा ऑनलाइन संगणक आधारित चाचणी (सीबीटी) पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला विरोध दर्शवत, सर्व परीक्षा पूर्ववत ऑफलाइन पद्धतीनेच घेण्यात याव्या या मागणीसाठी स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या वतीने विद्यार्थी प्रतिनिधी मनोज पिंगळे, अरविंद वाळेकर, धुकदेव टेले, भारत गौरव यांनी गेल्या तीन दिवसांपासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com