आमचं वय संपल्यावर राज्य लोकसेवा आयोग संयुक्त पूर्व परीक्षा घेणार काय?

सध्या महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील व्यवसाय, उद्योगधंदे सुरळीत सुरू आहेत फक्त स्पर्धा परीक्षाचे क्षेत्र बंद आहे.
MPSC
MPSCSakal

स्वारगेट - गेली दहा वर्षे झाली अभ्यास (Study) करतोय एक शेवटची परीक्षा (Exam) देऊन अधिकारी (Officer) होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. वय आत्ता बत्तीस आहे. नाही झालो तर करियरचा (Career) पर्यायी मार्ग शोधणार आहे. पण गेली दोन वर्ष परीक्षाच झाली नसल्याने कोणताच मार्ग स्वीकारता येत नाही. आम्ही फार कठीण अवस्थेतुन जात आहोत तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या विषयात लक्ष घालून लवकर परीक्षा घ्याव्यात अशी व्यथा सकाळशी बोलताना स्पर्धा परीक्षा विद्यार्थी विशाल गाढवे (Vishal Gadhave) यांनी मांडली आहे. (State Public Service Commission Conduct a Joint Pre Examination after Our Age)

सध्या महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील व्यवसाय, उद्योगधंदे सुरळीत सुरू आहेत फक्त स्पर्धा परीक्षाचे क्षेत्र बंद आहे. विद्यार्थ्यांनचा संयम सुटत चालला आहे. याचा उद्रेक होण्याच्या आधीच आपण नियोजित सप्टेंबर मधील सयुंक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर करावी व इतर परीक्षांच्या जाहिराती व वेळापत्रक तसेच ज्यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत त्यांना नियुक्ती द्यावी अशी मागणी विद्यार्थी वर्गाने एमपीएससी समन्वयक समितीमार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

MPSC
औंधमध्ये आढळलेल्या पिवळसर पांढऱ्या कासवाची आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये नोंद

गेली दोन वर्षे झाली कोरोनामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा पूर्वपरीक्षा वगळता एकही परीक्षा घेतलेली नाही. यामुळे विद्यार्थी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे.आमची वय संपल्यावर तुम्ही परीक्षा घेणार आहेत का असा उद्विग्न प्रश्न या विद्यार्थी वर्गाने उपस्थित केला आहे.गेल्या दोन वर्षात सहा वेळा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मग आम्ही किती दिवस वाट पाहत अभ्यास करायचा? तुम्ही सप्टेंबर मध्ये घेणार आहे म्हणता मग तारीख का जाहीर करीत नाहीत. अजून परीक्षा पुढे ढकलण्याचा तर विचार नाहीना असा संशय विचार त्यांच्या मनात उभा राहिला आहे .

राज्य सरकार आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी विद्यार्थ्यांच्या संयमाची परीक्षा न घेता लवकरात लवकर तारीख जाहीर करून परीक्षा घ्याव्यात. किती दिवस तुम्ही या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लांबणीवर ठेवणार आहात?

- महेश घरबुडे (विद्यार्थी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com