MPSC Exam : एमपीएससीचा ऑनलाइन परीक्षेचा निर्णय जुलै २०२७ पर्यंत लांबणीवर

राज्यभरातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा आणि नॉर्मलायझेशन प्रक्रियेला तीव्र विरोध केला होता.
MPSC Exam

MPSC Exam

esakal
Updated on

- प्रज्वल रामटेके

पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा संगणक आधारित (ऑनलाइन) पद्धतीने घेण्याच्या निर्णयाला राज्यभरातून होत असलेला तीव्र विरोध पाहता, अखेर आयोगाने एक पाऊल मागे घेतले आहे. ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६’ आता प्रचलित ऑफलाइन (ओएमआर) पद्धतीनेच होणार असून, संगणकाधारित (सीबीटी) परीक्षा पद्धतीची अंमलबजावणी जुलै २०२७ अखेरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर आयोगाने अधिकृत शुद्धिपत्रक प्रसिद्ध करून हा निर्णय जाहीर केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com