
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतलेल्या ‘निरीक्षक वैधमापन शास्त्र गट ब मुख्य परीक्षा २०२३’ या परीक्षेच्या पेपर तपासणीत घोडचूक झाल्याचे समोर आले. या प्रकारामुळे वर्णनात्मक पद्धतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेत पारदर्शकता नसल्याचे उघड झाले. त्यामुळे सप्टेंबरमध्ये वर्णनात्मक पद्धतीने होणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा (राज्यसेवा) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीने घ्यावी, अशी मागणी काही विद्यार्थ्यांनी केली आहे. तर वर्णनात्मक पद्धतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे काही विद्यार्थ्यांकडून स्वागतही करण्यात येत आहे.