onkar Lakade
sakal
सोमेश्वरनगर - निंबुत (ता. बारामती) येथील ओंकार लकडे याने एमपीएससी परीक्षेत यश मिळवत सहायक नगररचनाकार पदाला गवसणी घातली आहे. विशेष म्हणजे, त्याचे चुलत भाऊ अमरजित आणि वहिनी शिवानी यांच्यानंतर ओंकारनेही हेच पद मिळवल्याने लकडे कुटुंबात आता तीन राजपत्रित अधिकारी झाले आहेत.