MPSC Exam Paper : एमपीएससीच्या प्रश्नपत्रिकांच्या बदल्यात पैशांची मागणी; चौघांचा जामीन फेटाळला

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या पूर्व परिक्षेच्या प्रश्नपत्रिका देण्याचे आमिष.
Court
Courtsakal
Updated on

पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या पूर्व परिक्षेच्या प्रश्नपत्रिका देण्याचे आमिष दाखवून तरुणांकडे ३५ ते ४० लाखांची मागणी केल्या प्रकरणात चौघांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एच. वानखेडे यांनी हा आदेश दिला.

दीपक दयाराम गायधने (वय-२६, रा. नाणेकरवाडी, चाकण. मुळ रा. तामसवाडी, भंडारा), सुमीत कैलाश जाधव (वय-२३, रा. रानोबाई मळा, चाकण. मुळ रा. वेहेगाव, नाशिक) योगेश सुरेंद्र वाघमारे (वय-२७, रा. सोनुली वरठी, भंडारा), दीपक यशवंत साकरे (वय-२७, रा. गाव टेकडी, मध्य प्रदेश) अशी जामीन फेटाळण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणात जामीन मिळावा यासाठी चौघांनी न्यायालयात अर्ज केला. त्यास सहायक सरकारी वकील निलीमा यादव-इथापे यांनी विरोध केला. आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. परिक्षा प्रक्रियेमध्ये अडथळा आणण्याचा तसेच आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला आहे.

त्यांच्या या कृत्यामुळे परिक्षेपुर्वी एमपीएससी आयोगाबाबत विद्यार्थी व त्यांचे पालक यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. आरोपींना जामीन मंजूर झाल्यास ते गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी हजर न राहण्याची शक्यता आहे. याखेरीज, या गुन्ह्यातील साक्षीदारांवर दबाव आणून गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्याची शक्यता आहे, असा युक्तिवाद ॲड. इथापे यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com