Manisha Khedkar
sakal
पुणे
MPSC Exam Result : गुरोळी गावची लेक मनीषा खेडेकर झाली डीवायएसपी
मनीषाने दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये पहिली महिला पोलिस अधिकारी होण्याचा मान मिळविला.
गराडे - गुरोळी (ता. पुरंदर) येथील मनीषा रेखा बाळासाहेब खेडेकर या शेतकऱ्याच्या लेकीने २०२४ मधील राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. या परीक्षेमध्ये २२ व्या क्रमांका(रँक)ने उत्तीर्ण झाल्याने तिची उपविभागीय अधिकारी (डीवायएसपी) या पदासाठी निवड झाली. दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये पहिली महिला पोलिस अधिकारी होण्याचा मान मिळविल्याने ग्रामस्थांच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला.
