rutuja holkar
sakal
आंधळगाव - सादलगाव (ता. शिरूर) येथील ऋतुजा पंढरीनाथ होळकर हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत राज्यात २४ वा क्रमांक पटकावत उद्योग निरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. शेतकरी कुटुंबातील कन्येने जिद्द, चिकाटीच्या जोरावर मिळवलेल्या या यशामुळे परिसरात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.