Rishikesh bendre
sakal
न्हावरे - कोणताही खाजगी शिकवणी न लावता खोलीवरच अभ्यास करून जिद्द चिकाटीच्या जोरावर दुसऱ्याच प्रयत्नात आंबळे (ता. शिरूर) येथील ऋषिकेश बाळासाहेब बेंद्रे यांनी ४०० पैकी ३१० गुण मिळवून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांची उद्योग निरीक्षक आणि दुय्यम अधीक्षक (राज्य उत्पादन शुल्क) या दोन्ही पदांसाठी निवड झाली आहे.