MPSC inquiry : एमपीएससीच्या नऊ स्पर्धा परीक्षांतील कथित गैरव्यवहार आणि प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी तक्रारी व प्रतिज्ञापत्रे सादर करण्यासाठी २३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

MPSC Exam Scam Inquiry Deadline : एमपीएससीच्या नऊ स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहार आणि प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी तक्रारी व निवेदने सादर करण्यासाठी चौकशी आयोगाने २३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
MPSC Exam Scam Inquiry Deadline

MPSC Exam Scam Inquiry Deadline

esakal
Updated on: 

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या नऊ स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहार, प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका फुटल्याप्रकरणी तक्रारी व निवेदने सादर करण्यासाठी चौकशी आयोगाने २३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी १६ नोव्हेंबरपर्यंत निवेदने सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. दिवाळीच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून, संबंधितांनी विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र मुदतीत सादर करण्याचे आवाहन आयोगाचे सदस्य सचिव तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

Loading content, please wait...