esakal | 'लोकसेवा आयोग परीक्षेचा विषय हाताळण्यात कमी पडला'; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नाराजी
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit_Pawar

हा विद्यार्थ्यांचा प्रश्न असून आंदोलनही विद्यार्थ्यांचे होते.

'लोकसेवा आयोग परीक्षेचा विषय हाताळण्यात कमी पडला'; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नाराजी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ''स्पर्धा परीक्षेच्या तारखा पुढे ढकलणे योग्य नव्हते. शिवाय हा विषय हाताळण्यात राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) हाताळण्यात कमी पडला आहे. हे व्हायला नको होते आणि विद्यार्थ्यांवर आंदोलन करण्याची वेळ यायला नको होती,'' अशा शब्दांत या प्रकरणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत पवार यांनी विद्यार्थ्यांना आंदोलनामुळे झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरीही व्यक्त केली. 

Amazon-Flipkart ला स्वदेशी अॅप देणार टक्कर; जाणून घ्या Bharat e Market बद्दल सर्वकाही​

पुण्यातील कोरोना आढावा बैठकीनंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांना राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसंदर्भात आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनबद्दल विचारले असता ते म्हणाले, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता.११) विद्यार्थ्यांना आठवडाभरात परीक्षा घेण्याचे आणि परीक्षेची नवी तारीख शुक्रवारी (ता.१२) जाहीर करण्याचे वचन दिले होते. त्यानुसार शुक्रवारी सकाळीच सुधारित तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे इथेच हा विषय संपला आहे.

हवेलीत अवैध धंदे जोमात; तर पोलीस प्रशासन 'हप्ता वसुली' करण्यात मग्न​

आमदार गोपीचंद पडळकर यांनी या आंदोलनाबद्दल घेतलेल्या भूमिकेबद्दल पवार म्हणाले, "हा विद्यार्थ्यांचा प्रश्न असून आंदोलनही विद्यार्थ्यांचे होते. गेली तीस वर्षे आम्ही पण समाजकारणात आणि राजकारणात आहोत. या गोष्टी आम्हाला चांगल्या समजतात."

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image
go to top