''भरती प्रक्रियेला गती देण्यासाठी MPSC अॅक्शन मोडमध्ये'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MPSC Exam

''भरती प्रक्रियेला गती देण्यासाठी MPSC ॲक्शन मोडमध्ये ''

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा (Competitive Examination) आणि सरळसेवा भरती प्रक्रियेला गती देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहे, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी दिली आहे आयोगाकडे प्रलंबित असलेल्या भरती प्रक्रिया लवकर करण्यासाठी आयोग अॅक्शन मोड'मध्ये असून दोन दिवसांत वैद्यकीय शिक्षण विभागाच्या विविध पदांच्या मुलाखती घेऊन त्या मुलाखतींचा निकाल व गुणवत्ता यादी त्याच दिवशी जाहीर केली असल्याचे निंबाळकर म्हणाले. अशा प्रकारचे काम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (MPSC Exam Latest News In Marathi)

हेही वाचा: पुणे : फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्लांविरोधात गुन्हा दाखल

पुण्यातील परीक्षा केंद्रांना अचानक भेटी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा- २०२१ आज राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवरील १०९८ उपकेंद्रांवर घेण्यात आली. पुण्यातील विमलाबाई गरवारे प्रशाळा आणि एसएनडीटी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रांना निंबाळकर यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. आसनव्यवस्था आणि परीक्षार्थ्यांसाठी असलेल्या सुविधांची त्यांनी माहिती घेतली.

हेही वाचा: युक्रेनमधील भारतीयांना आणणारं विमान ४ वाजता मुंबईत उतरणार

दरम्यान, राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या वेळीही निंबाळकर यांनी नागपूर येथील परीक्षा केंद्रांना अचानक भेटी दिल्या होत्या. राज्यातील सर्व केंद्रांवर शनिवारी घेण्यात आलेली महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा- २०२१ सुरळीतपणे पार पडली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Mpsc In Action Mode To Accelerate Recruitment Process Says Mpsc Chairman Kishorraje Nimbalkar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top