

Group-B and State Services main exams postponed indefinitely
Sakal
प्रज्वल रामटेके
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) बहुचर्चित ‘गट-ब संयुक्त’ आणि ‘राज्यसेवा’ परीक्षांच्या मुख्य परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामुळे राज्यभरातून पुण्यात येऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे आणि आर्थिक नियोजन कोलमडले असून संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आयोगाने दोन्ही परीक्षांचे सुधारित वेळापत्रक तात्काळ जाहीर करून विद्यार्थ्यांना पुढील तयारीसाठी स्पष्ट दिशा द्यावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी केली आहे. यासंदर्भात ‘एमपीएससी’चे अतिरिक्त अध्यक्ष सतीश वाघोले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी याबाबत बोलण्यास आणि अधिक माहिती देण्यास नकार दिला.