

MPSC malpractice inquiry finally gets moving
Sakal
प्रज्वल रामटेके
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभारातील कथित गैरव्यवहार आणि प्रश्नपत्रिका, उत्तरतालिका फुटल्याच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी स्थापन झालेल्या आयोगाच्या कामकाजाला अखेर गती मिळाली आहे. नऊ परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांशी संबंधित परीक्षार्थी, विद्यार्थी, संस्था आणि नागरिकांना १६ नोव्हेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे निवेदने व पुरावे सादर करण्याचे आवाहन आयोगाने केले आहे. ‘सकाळ’ने चौकशी आयोगाच्या रखडलेल्या कामकाजाबाबत वृत्त प्रसिद्ध करून हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर आयोगाने जाहीर सूचना प्रसिद्ध केल्याने चौकशीच्या दिशेने पुढील पाऊल पडले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.