

MPSC Aspirants Continue Their Protest in Pune While Demanding an Inquiry Into the Commission Chairman
esakal
पुणे,: अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकार आणि एस. एम. जोशी येथे सुरू असलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये वाटाघाटी सुरू आहेत.
या पार्श्वभूमीवर आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या न्यायालयीन चौकशीसाठी स्थापन करण्यात येणाऱ्या समितीत आंदोलकांनी सुचविलेल्या पाच सदस्यांचा समावेश करावा आणि
चौकशी पूर्ण होईपर्यंत भिमनवार यांना पदावरून दूर ठेवावे, असा प्रस्ताव विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविला आहे. त्यामुळे आता प्रस्तावावर सरकार काय भूमिका घेणार? यावर आंदोलनाचे भवितव्य अवलंबून आहे.