

mpsc protest pune
esakal
पुणे : एमपीएससीच्या गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ साठी वयोमर्यादेच्या मुद्द्यावरून स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचा संताप अजूनही शमलेला नाही. शुक्रवारी डेक्कन परिसरात हजारो विद्यार्थ्यांनी केलेल्या तीव्र आंदोलनानंतरही सरकारकडून ठोस निर्णय न आल्याने विद्यार्थी शनिवारी (ता. ३ जानेवारी) पुन्हा रस्त्यावर उतरणार आहेत. सकाळी नऊ वाजता मुठा नदीपात्रात मोठ्या संख्येने जमण्याचे आवाहन विद्यार्थ्यांनी केले आहे.