एमपीएससीचा विक्रमी वेळेत निकाल

मुलाखतीनंतर अवघ्या चार तासात राज्यसेवा २०२०च्या गुणवत्ता यादी
MPSC Declared Result
MPSC Declared Resulte sakal

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रथमच राज्यसेवेचा निकाल विक्रमी वेळेत घोषित केला आहे. राज्यसेवा २०२०च्या मुलाखतींनतर अवघ्या चार तासात आयोगाच्या वतीने सर्वसाधारण गुणवत्ता यादी घोषित करण्यात आली आहे.

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२० करिता १८ ते २९ एप्रिल या कालावधीत घेण्यात आलेल्या मुलाखतीच्या आधारे ही यादी घोषित करण्यात आली आहे. राज्यात प्रमोद बाळासाहेब चौगुले ६१२.५० गुण संपादन करीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर नीतेश नेताजी कदम ५९१.२५ गुण मिळवत दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात तिसरी आणि महिलांमध्ये पहिला येण्याचा मान रूपाली गणपत माने हीने ५८०.२५ गुणांवर मिळविला आहे.

आयोगाने ५९७ उमेदवारांची गुणवत्ता यादी घोषित केली आहे. आजवरच्या आयोगाच्या इतिहासातील हा पहिला जलद गतीने लागलेला निर्णय आहे. ज्यामध्ये मुलाखती पार पडल्या त्याच दिवशी अवघ्या चार तासात अंतिम निकाल जाहीर केला आहे. आयोगाने आपल्या कार्यपद्धतीत केलेल्या बदलाचा हा परिणाम आहे. मागील महिन्यातही ज्या परीक्षांच्या मुलाखती झाल्या. त्याच दिवशी त्यांचे निकाल घोषित करण्यात आले आहे.

हीच गतीमानता कायम ठेवावी...

मुलाखतीच्याच दिवशी अंतिम निकाल घोषित करण्याची गतीमानता आयोगाने कायम ठेवावी,अशी अपेक्षा उमेदवारांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे प्रश्नपत्रिकेतील चुका आणि उत्तरतालीकेतील गडबडी सुधारण्यासाठीही आयोग इतकी गतीमानता का दाखवत नाही, असा प्रश्न राहुल कोळी यांनी उपस्थित केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com