esakal | एमपीएससीचे वेळापत्रक झाले जाहीर; आता अभ्यासिकाही सुरु करा...
sakal

बोलून बातमी शोधा

एमपीएससीचे वेळापत्रक झाले जाहीर; आता अभ्यासिकाही सुरु करा...

- अभ्यासिका चालू कराव्यात अशी विद्यार्थी आणि अभ्यासिका  चालकांची मागणी .

एमपीएससीचे वेळापत्रक झाले जाहीर; आता अभ्यासिकाही सुरु करा...

sakal_logo
By
महेश जगताप

पुणे : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो विद्यार्थी आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेकडे यावर्षी होणार की नाही, अशा शंकेत असतानाच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षेचे वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर टाकल्याने विद्यार्थ्यांनी पुन्हा अभ्यासिका चालू कराव्यात, अशी मागणी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या मध्यवर्ती भाग व इतर ठिकाणी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी व इतर विद्यार्थी मोठ्या प्रमाणात अभ्यासिकेत  बसतात. हजारोच्या संख्येत अभ्यासिका आहेत त्यामुळे याची उलाढाल ही कोटींच्या घरात आहे .गेले तीन महिने अभ्यासिका बंद असल्याने त्यांना फार मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

आयोगाच्या नवीन वेळापत्रकानुसार १३ सप्टेंबर २०२० रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर २०२० रोजी होणार आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर २०२० रोजी घेण्यात येणार आहे असे आयोगाने जाहीर केले आहे. कोरोनामुळे गावाकडे गेलेले विद्यार्थी पुन्हा पुण्याची वाट धरत आहेत. कोरोनामुळे विस्कळीत झालेल्या वेळापत्रकामुळे निराश झालेले विद्यार्थी पुन्हा एकदा नव्या उमेदीने अभ्यासाला लागणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

या परीक्षा नियोजित मे आणि जूनमध्ये होणार होत्या. पण कोरोना व्हायरसने देशात घातलेला धुमाकूळ पाहून आयोगाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून या परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या. त्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले होते. आता एक ते दोन वर्षे या परीक्षा होणार की नाही अशी चिंता त्यांना पडली होती. पण आयोगाने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केल्याने पुन्हा अभ्यास करून यशस्वी होण्यासाठी कष्टाची पराकाष्ठा करावी लागणार आहे, असे सुजित पोकळे या विद्यार्थ्यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

त्याचबरोबर अभ्यासिकेच्या मालकांनी शासनाचे योग्य ते नियम बाळगून सामाजिक अंतर ठेवून अभ्यासिका चालू करण्यात याव्यात अशी मागणी केली आहे कारण गेली तीन महिने अभ्यासिका बंद असल्याने त्यांना विनाकारण भाडे भरावे लागत असल्याने विनाकारण भुर्दंड सहन करावा लागत आहे . जर अभ्यासिका चालू केल्या तर आम्हाला थोडातरी आर्थिक दिलासा मिळेल व विद्यार्थ्यांची सोय होईल, अशी आशा अभ्यासिकेचे चालक अजित जव्हेरी यांनी केली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

योग्य ते सामाजिक अंतर पाळून व शासनाच्या नियमाच्या अधीन राहून अभ्यासिका चालू करण्यात याव्यात. त्यामुळे विद्यार्थ्यांचीही सोय व अभ्यासिका चालकांना आर्थिक आधार मिळेल.

loading image
go to top