mpsc student agitation pune
sakal
- प्रज्वल रामटेके
पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभाराविरोधात आणि विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनातच फूट पडली असल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, मुंबईला गेलेल्या शिष्टमंडळाने आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी चर्चा न करता निर्णय घेतल्याचा आरोप करत एका गटाने आंदोलन पुन्हा सुरू केले. त्यामुळे शुक्रवारी शहरात दोन ठिकाणी स्वतंत्र आंदोलने सुरू झाली.