MPSC Student Agitation
sakal
- प्रज्वल रामटेके
पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विद्यार्थ्यांचे एस. एम. जोशी पूल येथे सुरू असलेल्या आंदोलनस्थळी पोलिसांनी मोबाईल जॅमरची गाडी आणल्याने शुक्रवारी (ता. १०) आंदोलनाच्या दहाव्या दिवशी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलनाचे थेट प्रक्षेपण करता येणार नसल्याचे सांगत आमदार रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि टिळक चौकात जाण्याचा पर्याय सुचविला.