aditya thackeray visit to mpsc student agitation
sakal
- प्रज्वल रामटेके
पुणे - ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘अध्यक्षांचा राजीनामा झालाच पाहिजे’, ‘परीक्षांमध्ये पारदर्शकता आलीच पाहिजे’... अशा गगनभेदी घोषणा देत पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन गुरुवारी सलग सहाव्या दिवशीही धगधगत राहिले. जोपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत या मैदानातून मागे हटणार नाही, असा ठाम निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकार आणि ढिसाळ कारभाराचा निषेध म्हणून आपल्या ‘स्वप्नांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा’ काढून तीव्र संताप व्यक्त केला.