mpsc student agitation
sakal
- प्रज्वल रामटेके
पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाविरुद्ध (एमपीएससी) पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शनिवारी वेगळे वळण मिळाले. अध्यक्षांचा राजीनामा आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने परीक्षा घेण्याची मागणी करणाऱ्या दोन गटांच्या आंदोलनासोबतच वर्णनात्मक पद्धत कायम ठेवण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचा स्वतंत्र गटही रस्त्यावर उतरला आहे.
त्यामुळे शहरात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची तीन ठिकाणे झाली असून, परीक्षा पद्धतीवरून विद्यार्थ्यांमधील मतभेदही उघडपणे समोर आले आहेत. त्यातच विविध राजकीय नेते, माजी सनदी अधिकारी आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी आंदोलनस्थळी भेटी दिल्याने आंदोलनाची व्याप्ती वाढली आहे.
mpsc agitation
sakal