MPSC Student Agitation
sakal
- प्रज्वल रामटेके
पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा पद्धतीत वारंवार होणाऱ्या बदलांच्या शक्यतेमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. केवळ रस्त्यावरील गर्दीच्या दबावाखाली येऊन नवीन वर्णनात्मक पद्धत रद्द करून पुन्हा वस्तुनिष्ठ पद्धत आणण्याच्या हालचालींना विद्यार्थ्यांनी कडाडून विरोध केला आहे. ‘आम्ही प्रयोगशाळेतले उंदीर नाही. जर गर्दीच्या मागणीवरूनच अभ्यासक्रम ठरणार असेल, तर थेट चिठ्ठ्या टाकूनच अधिकारी निवडा,’ असा संतप्त सवाल करत एमपीएससी परीक्षार्थींनी पुण्यातील टिळक चौकात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.