'एमपीएससी'चे विद्यार्थी पुन्हा आक्रमक; आंदोलनाचा इशारा

आयोगाच्या संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख अद्याप जाहीर न केल्याने विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. परीक्षेच्या तारखा लवकरात लवकर जाहीर करावी, अशी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे.
MPSC
MPSCe sakal

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील सदस्यांच्या (MPSC) ३१ जुलैपर्यंत नियुक्त्या करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार (AJIT PAWAR)यांनी दिले होते. मात्र, मुदत उलटूनही दिलेले आश्वासन पूर्ण केलेले नाही, तसेच आयोगाच्या संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख अद्याप जाहीर न केल्याने विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. परीक्षेच्या तारखा लवकरात लवकर जाहीर करावी, अशी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे. या मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या सोमवारपासून (ता.९) आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. (MPSC students aggressive again warning Movement)

महाराष्ट्र राज्य सेवा आयोगामार्फत रखडलेल्या परीक्षा लवकरात लवकर घेण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा होत आहेत, तसेच अकरावी प्रवेशासाठी ‘सीईटी’ परीक्षेसह विविध परीक्षा ऑगस्ट, सप्टेंबर या कालावधीत होत आहे. असे असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोग रखडलेल्या परीक्षा घेण्यास काय हरकत आहे. आयोगाने विद्यार्थ्यांच्या मन:स्थितीचा विचार करून रखडलेल्या परीक्षांच्या तारखा जाहीर कराव्यात, अशी मागणी एमपीएससी स्टुंडटस्‌ राईटस्‌चे महेश बडे यांनी केली. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही बडे यांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com