MPSC Student : आर्थिक कोंडीमुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी धरली गावाची वाट; अभ्यासिका पडल्या ओस?

दुष्काळ, रखडलेल्या परीक्षा आणि अनिश्चिततेमुळे पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर जगण्याचा भीषण संघर्ष
MPSC students head back to village due to financial crunch

MPSC students head back to village due to financial crunch

Sakal

Updated on: 

प्रज्वल रामटेके

पुणे : ‘‘आई-वडिलांनी अकोल्यातील गावात तीन एकरांत पेरलेले पीक पावसाने दगा दिल्याने करपून गेले. डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. मी इथं पुण्यात अभ्यास करून अधिकारी होईल आणि आपल्या कुटुंबाच्या कष्टाचा, संघर्षाचा कायमचा अंत होईल, ही उराशी बाळगलेली एकमेव अपेक्षाही आता कोमेजून गेली आहे. पुढील दोन महिने परीक्षा नाहीत. झालेल्या परीक्षांमध्येही गोंधळ झाल्याने निकाल आणि नियुक्त्या रखडल्या आहेत. अशा परिस्थितीत पुण्यात राहण्याचा खर्च आता कसा परवडणार? त्यामुळे खोलीचा या महिन्याचा महिना भरला की थेट गावाची वाट धरणार...’’ हे सांगताना साहिलचे (नाव बदलले आहे) डोळे पाणावले होते.

Loading content, please wait...