

MPSC
- प्रज्वल रामटेके
पुणे - अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून राज्याच्या कानाकोपऱ्यातून पुण्यात आलेले विद्यार्थी आता वाढत्या आर्थिक अडचणींमुळे पुन्हा गावाकडची वाट धरत आहेत. एका बाजूला एमपीएससीच्या परीक्षांमधील अनिश्चितता, निकालांना होणारा विलंब आणि वाढता खर्च, तर दुसरीकडे गावाकडील दुष्काळामुळे निर्माण झालेली आर्थिक ओढाताण, अशा दुहेरी कात्रीत विद्यार्थी सापडले आहेत.