

Government open to dialogue as MPSC students continue protest
sakal
प्रज्वल रामटेके
पुणे : ‘‘स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारची भूमिका सकारात्मक असून, त्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल. चर्चेतून प्रश्न सोडविण्याची सरकारची मानसिकता आहे. आंदोलनापेक्षा चर्चेतून मार्ग काढणे अधिक महत्त्वाचे आहे,’’ अशी भूमिका आमदार विक्रम पाचपुते यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) अध्यक्ष चौकशीत दोष सिद्ध झाल्यास संबंधितांवर तातडीने कारवाई केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.