
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) स्पर्धा परीक्षेतील अर्ज प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वाची ठरणारी ‘ई-केवायसी’ प्रक्रिया अखेर सुरू केली आहे. आयोगाने यासंदर्भातील सुधारित परिपत्रक प्रसिद्ध करत २५ जुलै २०२५ पासून ही प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आता कोणत्याही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने आपली ओळख पडताळणी पूर्ण करणे अनिवार्य असणार आहे. अन्यथा, उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.