Electricity Theft Crime
sakal
पुणे - पुणे परिमंडलात महावितरणने वीजचोरीविरोधात राबविलेल्या विशेष मोहिमेत अवघ्या पंधरा दिवसांत एक हजार २८१ वीजचोरांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत तीन लाख ४० हजार ७३० युनिट वीजचोरी उघडकीस आली असून, संबंधितांवर ८१ लाख ५५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा महावितरणने दिला आहे.