

बारामती - ‘महावितरण’च्या बारामती परिमंडळात वीजचोरीविरोधात धडक मोहीम सुरू असून, जुलै महिन्यापासून १९ ऑगस्टपर्यंतच्या दीड महिन्याच्या कालावधीत वीजचोरीप्रकरणी तब्बल एक हजार ७५९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
तालुक्यात एक हजार ३१० प्रकरणांमध्ये सुमारे १२ लाख २७ हजार युनिट वीजचोरी आढळून आली असून, संबंधितांकडून दोन कोटी ७२ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.