esakal | महावितरण कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; कोरोनाने मृत्यू झाल्यास मिळणार 30 लाख रूपये
sakal

बोलून बातमी शोधा

MSEDCL employees in case of death by corona Sanugrah grant of Rs 30 lakhs

कोरोनाने मृत्यु झाल्यास महावितरण कर्मचाऱ्यांच्या वारसांना 30 लाख रूपयांचे सानुग्रह अनुदान

महावितरण कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; कोरोनाने मृत्यू झाल्यास मिळणार 30 लाख रूपये

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : राज्यातील वीजग्राहकांना अखंडित वीजपुरवठा पुरवठा करण्यासाठी कोरोनाच्या काळातही काम करणाऱ्या कामगारांची दखल महावितरणकडून घेण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊन मृत्यू आल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना तीस लाख रूपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

महावितरणमध्ये संचालन व दुरूस्तीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना (बाह्यस्त्रोत) तसेच महावितरणच्या विविध कार्यालयात कार्यरत असणाऱे सुरक्षा रक्षक यांना देखील 30 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय ऊर्जा विभागाने घेतला असल्याचे आहे. 
-----------
भारत-चीन संघर्ष पुन्हा थांबणार की पुन्हा पेटणार?
-----------
योगामुळे प्रतिकारशक्ती वाढते; कोरोनाशी लढण्यासही होईल मदत : पंतप्रधान मोदी
-----------
कोरोनाच्या सार्वत्रिक प्रादुर्भामध्ये महावितरणचे अभिंयते, कर्मचारी व बाह्यस्त्रोत कंत्राटी कर्मचारी वेळीअवेळी वीजपुरवठा खंडित झाल्यास आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. राज्य प्रशासन कोरोनाचा पराभव करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत असतांना राज्यातील सामान्यांना घरातच थांबणे आवश्‍यक आहे. अशा घरात राहणाऱ्या व घरूनच कामे करणाऱ्यांना महावितरणने चोवीस तास अखंडित वीजपुरवठा देऊन मोठा दिलासा दिला आहे. याद्दष्टिने महावितरणचे कर्मचारी देखील हे कोरोनायोध्दे ठरलेत. कर्मचाऱ्यांची सुरक्षा, तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या भवितव्याबाबत ऊर्जा विभागाने गांभीर्य राखून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

महावितरणचे तांत्रिक तसेच अतांत्रिक प्रवर्गात कार्यरत असणारे सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे सानुग्रह अनुदान लागू राहणार आहे. कर्मचाऱ्यांचा मृत्यू हा कोविड- विषाणूने झाला असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र हे शासकीय, नगरपालिका, महानगरपालिका, आयसीएमआर नोंदणीकृत खासगी रुग्णालये, प्रयोगशाळा यांच्याकडून प्राप्त अहवालाच्या आधारे करण्यात आलेले असावे. हे सानुग्रह अनुदान अदा करण्यासाठी कामावरील उपस्थितीबाबत अटी व शर्ती या महाराष्ट्र शासन निर्णयानुसार राहतील, असेही महावितरणने स्पष्ट केले आहे.

loading image
go to top