MSEDCL : महावितरण देणार ग्राहकांना दिलासा; नवीन वीजजोड घेताना ‘सुपरव्हिजन चार्ज’मध्ये सवलत

वीन वीजजोडसाठी रस्त्याचे खोदकाम आणि पुनर्भरणासाठी परवानगी देताना महापालिकेकडून आकारले जाणारे शुल्क महावितरणच्या दराने भरण्याची सवलत
msedcl gives Discount offer on Supervision Charge on new electricity connection
msedcl gives Discount offer on Supervision Charge on new electricity connectionsakal
Updated on

पुणे : नवीन वीजजोड घेताना ग्राहकांना आकारण्यात येणाऱ्या ‘सुपरव्हिजन चार्ज’मध्ये महावितरणकडून मोठा दिलासा मिळणार आहे. अशा प्रकरणांमध्ये परवानगी देताना ग्राहकांना ‘हे काम महावितरणचे आहे’ असे पत्र दिले जाईल. त्यामुळे नवीन वीजजोडसाठी रस्त्याचे खोदकाम आणि पुनर्भरणासाठी परवानगी देताना महापालिकेकडून आकारले जाणारे शुल्क महावितरणच्या दराने भरण्याची सवलत मिळेल.

रस्त्याचे खोदकाम करून केबल टाकण्यासाठी ११ हजार २९२ रुपये प्रति रनिंग मीटर ‘सुपरव्हिजन चार्ज’ महापालिकेकडून आकारला जातो. हेच काम महावितरणने केल्यास दोन हजार ३०० रुपये लागतात.

कोणत्याही पद्धतीने काम केले, तरी ते महावितरणच्या मालकीचे होते. त्यामुळे नागरिकांना रस्त्याच्या खोदकामापोटी प्रती रनिंग मीटर आठ हजारांचा अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागतो. महावितरणकडे साहित्य उपलब्ध नसल्यामुळे अनेकदा नागरिकांना कामे करून घेण्यास सांगितले जाते.

त्यामुळे महापालिकेने नागरिकांनाही सवलतीचा दर लावण्यासाठी महावितरणने पुढाकार घ्यावा, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली होती. त्यावर पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार म्हणाले, ‘‘सुपरव्हिजन चार्जच्या माध्यमातून कामास मंजुरी देताना ‘हे काम महावितरणचे आहे’ असे पत्र ग्राहकांना देण्यात येईल. त्यामुळे रस्त्याच्या खोदकामासाठी महावितरणला जो सवलतीचा दर आहे, तोच महापालिकेने ग्राहकांकडून आकारावा, यासाठी आम्ही पत्र देऊ.’’

...अशी होते ग्राहकांची लूट

उदा. दहा सदनिकांची इमारत आहे. त्यातील नागरिकाने नवीन वीजजोडसाठी अर्ज केला. त्यासाठी एका वीजजोडला सात हजार ६०० रुपये ‘सर्व्हिस कनेक्शन चार्ज’ याप्रमाणे दहा वीजजोडचे ७६ हजार रुपये अधिक १८ टक्के जीएसटी, असे ८९ हजार ६८० रुपये खर्चाचे अंदाजपत्रक ग्राहकांना दिले जाते.

हे काम ‘सुपरव्हिजन चार्ज’ पद्धतीने करायचे ठरविल्यास या रकमेच्या १.३ टक्के शुल्क घेऊन महावितरणकडून परवानगी दिली जाते. मात्र, जवळच्या ट्रान्सफॉर्मरमधून इमारतीपर्यंत केबल टाकण्याची जबाबदारी ग्राहकावर येते. अशा प्रकरणांमध्ये ग्राहकाला महापालिकेकडून रस्ते खोदाईची परवानगी घ्यावी लागते.

४० मीटर केबल टाकण्यासाठी प्रती रनिंग मीटर ११ हजार २९२ रुपये शुल्क महापालिकेकडे भरावे लागते. हेच काम महावितरणने केल्यास महापालिकेला प्रती रनिंग मीटर दोन हजार ३०० रुपये शुल्क भरावे लागते. महावितरणचा हा दर सर्वसामान्य ग्राहकांसाठी लागू करावा, अशी मागणी होती. ती अखेर मान्य झाली, असे वेलणकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com