

Power Supply Cut Off
पुणे - वारंवार पाठपुरावा करूनही वीजबिल भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या थकबाकीदारांविरुद्ध महावितरणने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पुणे परिमंडलात ३१९ कोटी ५० लाख रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी धडक मोहीम राबवण्यात येत असून, १ मार्चपासून आतापर्यंत ७ हजार १२२ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.