बारामतीत महावितरणच्या वायरमनला मारहाण । Baramati | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परिमंडळ महावितरण

बारामतीत महावितरणच्या वायरमनला मारहाण

माळेगाव : बारामती तालुक्यात पारवडी गावात आकडा टाकण्यास मनाई केल्याच्या कारणाने आज तिघांनी महावितरण कंपनीच्या वायरमनला जबर मारहाण केली व त्यांनी शासकिय कामात आडथळ आणण्याचा प्रय़त्न केला. त्यामध्ये आस्लम मन्यार (पुर्ण नाव पत्ता माहित नाही ), सोमनाथ हनुमंत जगताप ( रा. सावळ ता. बारामती)  व एका अनोळखी इसमाचा समावेश आहे. त्या प्रकरणी प्रमोद शिवाजी नांगरे (वय २५, धंदा नोकरी- महावितरण कंपनी, बारामती) यांनी तालुका पोलिस ठाण्यात वरील तिघांविरुद्ध फिर्य़ाद दिली.

"सावळ येथील आटोळेवस्ती परिसरात विजबिल थकबाकी वसुली करणे कामी गेलो होतो. त्या ठिकाणी इलेक्ट्रीक पोलवर आनाधिकृतपणे दोन आकडे टाकुन वीज वापर चालु असल्याने वरील लोकांना अटकाव केला. परंतु त्यांनी मला मारहाण केली व शासकिय कामात अडथळा आणला. त्यामुळे आस्लम मन्यार, सोमनाथ हनुमंत जगताप व एका अनोळखी इसमांविरुद्ध मी तक्रार देत आहे" असे नांगरे यांनी फिर्यादिमध्ये नमूद केले आहे.

त्यानुसार पोलिसांनी संबंधित संशयित आरोपींविरुद्ध तालुका पोलिसांनी मारहाण करून जखमी करणे, शासकिय कामात अडथळा आणणे, शिवीगाळ व दमदाटी करणे, वीजेची चोरी करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला. पोलिस हवालदार शिंगाडे वरील प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune NewsBaramati
loading image
go to top